Posts

Image
                                  स्वप्नातीत भृगू लेक ट्रेक   हिमालय पर्वतराजीत एकदा तरी ट्रेकिंगला जावं असं  महाविद्यालयात एन. सी. सीत असल्यापासूनचं माझं स्वप्न होतं. ते पूर्ण व्हायचा योग जवळपास 25 वर्षांनी आला ते केवळ ट्रेकर भूषण कोलते, भटकंतीची आवड असलेल्या आणि फोटोग्राफर स्वप्निल शेट्ये, लेखक निखिलेश चित्रे, हॉटेल व्यावसायिक अमोल कबाडी या मित्रांमुळे.  नोकरी आणि व्यवसाय यामुळे आम्ही पाच मित्र एकत्र येणं तसं अवघड होतं. मात्र ट्रेकच्या निमित्तानं एकत्र आलो. या पूर्वी आम्ही मुंबई-पुण्याजवळचे छोटे छोटे  ट्रेक  साधारणत: भल्या पहाटे निघून रात्री पुन्हा मुंबईत परत  अशा स्वरूपात केले आहेत. हिमालयातील ट्रेक करताना तो छोटा की मोठा करावा यावर बराच काळ चर्चा झाल्यानंतर सुरूवात तरी छोट्या ट्रेकनंच करायची असं सर्वानुमते ठरलं. अर्थात हिमालयातील कुठलाही ट्र...