स्वप्नातीत भृगू लेक ट्रेक
हिमालय
पर्वतराजीत एकदा तरी ट्रेकिंगला जावं असं महाविद्यालयात एन. सी. सीत
असल्यापासूनचं माझं स्वप्न होतं. ते पूर्ण व्हायचा योग जवळपास 25 वर्षांनी
आला ते केवळ ट्रेकर भूषण कोलते, भटकंतीची आवड असलेल्या आणि फोटोग्राफर
स्वप्निल शेट्ये, लेखक निखिलेश चित्रे, हॉटेल व्यावसायिक अमोल कबाडी या
मित्रांमुळे. नोकरी आणि व्यवसाय यामुळे आम्ही पाच मित्र एकत्र येणं तसं
अवघड होतं. मात्र ट्रेकच्या निमित्तानं एकत्र आलो. या पूर्वी आम्ही
मुंबई-पुण्याजवळचे छोटे छोटे ट्रेक साधारणत: भल्या पहाटे निघून रात्री
पुन्हा मुंबईत परत अशा स्वरूपात केले आहेत. हिमालयातील ट्रेक करताना तो
छोटा की मोठा करावा यावर बराच काळ चर्चा झाल्यानंतर सुरूवात तरी छोट्या
ट्रेकनंच करायची असं सर्वानुमते ठरलं. अर्थात हिमालयातील कुठलाही ट्रेक हा
आव्हानात्मकचं असतो हे ही तेवढंच खरं आहे. ट्रेकिंगचं आयोजन करणाऱ्या
बऱ्याच व्यावसायिक ट्रेकिंग संस्थांची माहिती घेतल्यानंतर एका नामवंत
संस्थेतून हिमाचल प्रदेशातील मनालीजवळच्या भृगु लेक इथल्या ट्रेकला जायचं
ठरलं. आम्हा शिक्षकांना मिळणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा पुरेपूर
उपयोग करून घेणं यावेॆळी मला सहज शक्य झालं. ट्रेकिंगसाठी रोज सकाळी आणि
संध्याकाळी असा तासभर चालण्याचा भरपूर सराव केला. सुट्टीत गावी गेल्यावर
जवळचे डोंगर चढण्या उतरण्याचा सराव केला. नंतर ट्रेकसाठी ट्रेकिंग संस्थेनं
सागितलेल्या यादीप्रमाणे आवश्यक वस्तूंची खरेदी केली. भूषणनं हिमालयातील
ट्रेक केले असल्यानं खरेदी करताना कमी महत्वाच्या गोष्टी टाळणं सहज शक्य
झालं.
हिमालयाच्या
भव्यतेबद्दल खूप काही ऐकलं-वाचलं होतं. या ट्रेकमधून मात्र हिमालय
प्रत्यक्ष जवळून अनुभवता येणार होता. 9 जून ते 12 जून असा 4 दिवसांचा
ट्रेकचा कालावधी होता.
मनालीतील थंड हवामानाशी जूळवून
घेण्याच्या दृष्टीने तीन दिवस अगोदर मुंबईहून चंदीगड आणि पुढे मनाली असा
प्रवास करून आम्ही मनालीला पोहोचलो. या काळात त्या ठिकाणच्या रोरीच
म्युझियम, हिडीम्बा मंदीर, माल रोड या ठिकाणांना भेटी दिल्या.
या
हिमालयीन ट्रेकसाठी भारताच्या वेगवेगळ्या भागातून आलेलो आम्ही सगळे
बावीसजण ट्रेकिंग संस्थेच्या नियोजनानुसार मनालीच्या मार्केटमधील खुल्या
रंगमंचाजवळ भेटलो. ट्रेकमध्ये दहावीत शिकत असलेल्या मुलीपासून ते अगदी
मोठ्या पदावर काम करणाऱ्या पन्नाशी पार केलेल्या व्यक्तिंचाबरोबरच अगदी
एकट्याने ट्रेकला आलेल्या मुलींचाही समावेश होता.
चार
दिवसांच्या ट्रेकच्या पहिल्या दिवसाची सुरूवात मनालीहून जीपने झाली. अतिशय
अरूंद आणि वळणावळणांच्या रस्त्यांतून प्रवास करणं हा अगदी अद्भुत आणि
रोमांचकारी अनुभव होता. खोल-खोल दऱ्या, डोंगर उतारांवरचे सूचिपर्णी वृक्ष
आणि दूरवर दिसणारी हिमशिखरं यामुळे वास्तवाचा विसर पडावा अशीच माझी अवस्था
झाली होती. मनाली ते गुलाबा हे अंतर साधारणत: तासभराचं आहे. मात्र
ट्रॅफिक आणि पाऊस यामुळे त्या ठिकाणी पोहोचायला जवळजवळ दोन तास लागले. तिथे
उतरल्यानंतर ट्रेक लीडरनं आम्हा सर्वांना बेस कँम्पच्या दिशेनं
निघण्याच्या सूचना दिल्या. साधारणत: पंधरा मिनीटं चालल्यानंतर आणि दोन
छोट्याशा टेकड्या पार केल्यानंतर पुढच्या टेकडीच्या पायथ्याजवळ असलेल्या
बेस कँम्प वर पोहचलो. तिथे राहण्यासाठी अतिशय सुंंदर टेन्ट उभे केले होते.
दोघांना मिळून एक टेंन्ट असं गृप लीडर रविंद्रनाथने नियोजन केलं होतं. त्याप्रमाणे दिलेल्या टेंन्टमध्ये बॅगा ठेवल्या. त्याने सर्वांना थोडावेळ आपापल्या टेन्टमध्ये जाऊन आराम करायला सांगितलं. थोडयावेळानंतर एका काँमन टेन्टमध्ये बोलावलं. तिथे प्रत्येकाला स्वत:चा परिचय देण्याबरोबरच ट्रेकची तयारी कशी केली ते सांगायला सांगितलं. नंतर ट्रेकला जाताना स्वत:ची काळजी कशी घ्यायची याचं मार्गदर्शन लीडरने केलं. हसतखेळत आणि खेळीमेळीच्या वातावरणात वेळ कसा गेला ते कळलं सुद्धा नाही. नंतर थोडंफार फिरणं आणि गप्पा झाल्या. साधारणत: आठच्या सुमाराला जेवण झालं. दुसऱ्या दिवशीच्या ट्रेकचं ठिकाण बारा हजार पाचशे फूट इतक्या उंचीवर होतं.पहिल्या दिवशी आम्ही जिथे मुक्काम केला तो गुलाबा इथला बेस कँप दहा हजार फुटांवर होता.म्हणजे दुसऱ्या दिवशी दोन हजार फूट चढून जायचं होतं.त्यामुळे सकाळी लवकर उठून आठ वाजेपर्यंत तयार रहायला सांगण्यात आलं. मला पहाटे पाचलाच जाग आली. ठरल्याप्रमाणे चहा आणि नाश्ता घेऊन आठ वाजता ट्रेकसाठी तयार झालो. उंच पर्वतीय भागात ट्रेकिंगला जाताना त्रास होऊ नये या साठी आयोजक संस्थेनं सांगितलेल्या सूचनांनुसार डायमाँक्सची गोळी घेऊन ट्रेकला सुरूवात केली. ट्रेक सहजपणे करता यावा यासाठी माझ्याकडे असलेली भली थोरली ट्रेकिंग सॅक मी ग्रुप लीडरकडे जमा केली. त्याने ती खेचराच्या मालकाकडे दिली.

दुसऱ्या
दिवसाचा ट्रेक रोलाखोली पर्यंत होता. सुरूवातीलाच लिडरने मला अगदी
सर्वांच्या पुढे चालायला सांगितलं. त्याप्रमाणे मीही आनंदाने सुरूवात केली.
सकाळच्या प्रसन्न वातावरणात ट्रेकला सुरूवात झाली. ट्रेकिंगच्यावेळी
सुरूवातीला छोट्या छोट्या टेकड्या पार करताना मजा यायची. ते करताना शक्यतो
पुढे बघावं, वर अथवा मागे बघू नये, सतत हळूहळू का होईना पण एकसारखं चालतचं
रहावं, दम लागला तरी तोंडाने श्वास न घेता नाकावाटेच श्वास घ्या असा मंत्र
लिडरनं दिला होता. त्याचं मी मनापासून जमेल तसं पालन करण्याचा प्रयत्न
करीत होतो. पुढेपुढे तर टेकड्यांमागून टेकड्या आणि त्याही उंचच उंच संपता
संपेनात. मला सारखी धाप लागत असे. मला जमेल ना? काही त्रास होणार नाही
ना? असे प्रश्न मला सारखे सतावत असंत . मात्र ते थोड्यावेळापुरतेच
असायचे.अधूनमधून धुकं आणि पाऊस असा खेळ असायचाच. ट्रेक लिडरचे 'शाबाश!
शाबाश!' हे उत्साह वाढवणारे शब्द त्यावेळेस आँक्सिजनसारखे वाटायचे.
रोलाखोलीच्या मार्गात टेकड्यांवर अनेक ठिकाणी लाल आणि पिवळ्यारंगांची लहान
लहान फुलं उमललेली होती. हिमालय पर्वतीय भागात ढगफुटी नवीन नाहीत.
त्यांच्याबद्दल फक्त ऐकून होतो. पण ढगफुटीनं बदल झालेलं भूरूप एका ठिकाणी
बघायला मिळालं. विश्वासच बसत नव्हता इतकं आजूबाजूच्या भागापेक्षा ते वेगळं
दिसत होतं. हिम वितळल्यामुळे अगदी रोलाखोलीपर्यंत बकऱ्या आणि मेंढ्यांचे
कळप उंचउंच भागात चरताना दिसत होते.
अधूनमधून खेचरं ट्रेकचं सामान वाहताना दिसंत होती. ट्रेकिंगला मोठ्या प्रमाणात या काळात देशी-विदेशी लोक येतात. त्यामुळे काही स्थानिकांनी अगदी उंच भागातही चहा, काँफी, बिस्किट्स, मॅगी इत्यादींची सोय केली होती. साधारणत: अकरा वाजायच्या सुमाराला य़ा दुकानाजवळ सगळ्यांनी थोडावेळ थांबून चहा-कॉफीचा आस्वाद घेतला. मला तर चालूनचालून प्रचंड थकवा आला होता. पण थोडंच अंतर आहे असं लिडर पुन्हा पुन्हा सगळयांना बजावत असल्यानं मीही थकवा बाजूला करून चालत असे. नंतर पुन्हा मार्गात टेकड्या सुरू झाल्या. खास ट्रेकिंगसाठी तयार करण्यात आलेली वॉकिंग स्टिक मी विकत घेतली होती.टेकड्या चढताना तिचा या सबंध ट्रेकिंगमध्ये खूप उपयोग झाला. एक-दोनवेळेला आेलसरपणामुळे घसरून पडण्यापासून तिने वाचवलं,तर एकदा गुडघाभर बर्फात उजवा पाय अचानक दोनतीन फूट आत गेल्यानंतर बाहेर येताना तिनेच आधार दिला.आम्ही सगळेजण हसत खेळत आणि एकमेकांना सांभाळून घेत रोलाखोलीला साधारणत: दुपारी दीडच्या सुमाराला पोहचलो. ग्रुप लिडरने आम्हाला आमचे टेंन्ट दाखवले. आत जाऊन थोडावेळ बसत नाही तोच जोराचा पाऊस आणि समोरची व्यक्तीही दिसू शकणार नाही असं धुकं, हे सगळं कल्पनेपलीकडचं होतं.
थोड्या वेळानं पाऊस उघडल्यावर दुपारचं जेवण कॉमन टेंन्टमध्ये घेतलं. मग रोलाखोलीचा परीसर बघण्यात संध्याकाळ कधी झाली ते कळलंच नाही. रात्री गृप लीडरने तिसऱ्या दिवसाच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्याने सगळ्यांची रक्तामधली ऑक्सिजनची पातळी तपासली. सगळ्यांचीच पातळी योग्य प्रमाणात असल्यानं सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. सकाळी साडेपाचला चहा, सहा वाजता नाश्ता आणि दुपारचं लंच बरोबर न्यावं लागणार होतं. त्याबाबतच्या सगळ्या सूचना त्याने दिल्या. हा ट्रेकचा तिसऱ्या दिवसाचा टप्पा महत्तवाचा होता. दुसऱ्या दिवसाचा ट्रेक मला दमछाक करणारा वाटला तरी सुध्दा पुढचे दोन दिवसही महत्तवाचेच होते. मित्रमंडळींचं प्रोत्साहन या एकंदरीत ट्रेकमध्ये फार महत्वाचं होतं.रात्री फार थंडी वाजत होती. कपड्यांचे अगदी तीन-तीन थर घालून सुद्धा थंडी वाजणं कमी झालं नाही. त्यामुळे पुरेशी झोप लागली नाही. शिवाय भृगू लेक पर्यंत चढून जाईन की नाही याचाही बराच ताण शेवट पर्यंत माझ्या मनावर होताच. रात्रीच्या झोपेतही मला भृगु लेक दिसत होता. मला तिथे गेलंच पाहीजे असं माझं मन पुन्हा पुन्हा सांगत होतं.

ट्रेकचा
तिसरा दिवस माझ्यासाठी अतिशय महत्वाचा होता. पहाटे चारलाच मला जाग आली.
बाहेर प्रचंड थंडी आणि पावसाळी वातावरण. बरोबर साडेसहाला आवश्यक त्या
गोॆष्टी बरोबर घेऊन ट्रेकला सुरूवात झाली. भृगु लेक चौदा हजार फूट इतक्या
उंचीवर आहे. तिथपर्यंत जाणं हे माझ्याकरीता फार महत्वाचं होतं. अगदीच
तीव्र उतार असलेल्या साधारणत: दोन टेकड्या चढून गेल्यावर श्वास घ्यायला
त्रास व्हायला सुरूवात झाली. मागचे ट्रेकर आता पुढे जाताहेत म्हटल्यावर एक
प्रकारचा ताण जाणवायला लागला. ग्रूप लीडरचं 'चलो, चलो, आगे रूकेंगे' चालूच
असायचं. पण या सगळ्या गोष्टी बाजूला करून मी आपलं 'एकला चालोरे' सुरूच
ठेवलं.
फार मागे राहण्याने मनाला मरगळ आणि शारिरीक थकवा जाणवायचा. ते टाळण्यासाठी मधेच चालण्याची गती वाढवायचो. फार मागेही नाही आणि फार पुढेही नाही अशी चालताना गती ठेवण्याचा माझा प्रयत्न असायचा. या ट्रेकमध्ये खूपदा बर्फातून चालावं लागलं. अनुभवी ट्रेकरच्या मागे त्याच्या पावलांवर पाऊल टाकल्यास बर्फातून चालणं सोपं होतं. एकदा तर माझा उजवा पाय अचानक गुडघाभर खाली गेला. दोन दगडांच्या खाचेत अडकला. खूप घाबरलो, काय करावं कळेना. बरोबरच्या ट्रेकरनं जवळची काठी दिली, तरीही काही उपयोग झाला नाही. शेवटी आधी मनाला समजावलं. निकराचा प्रयत्न करून पाय बाहेर काढला. बर्फावरून चालणं आणि जमिनीवरून चालणं या दोन्हींत खूप फरक असतो हे तेव्हा लक्षात आलं, तुलनेनं जमिनीवरून चालणं सोपं आहे.

सकाळी
साडेदहाच्या सुमारास जवळजवळ पाच किलोमिटर अंतर चालून गेल्यानंतर भृगू लेक
जवळ पोहोचलो. तिथे पोचल्यानंतरचा सगळयांना झालेला आनंद ही गोष्ट फक्त
अनुभवण्याचीच बाब होती.
पाचदहा मिनीटं फक्त शांत बसून भृगू लेक आणि आजूबाजूच्या हिम शिखरांना डोळेभरून बघून घेतलं. नंतर ग्रूप लीडरच्या विनंतीनुसार सगळ्यांनी गृप फोटो काढुन घेतले.
भृगू लेक पासून जवळच्याच टेकडीवर दुपारचं जेवण घेतलं. खराब हवामानामुळे तिथे जास्त काळ थांबता येणार नसल्याचं ग्रुप लीडरनं सागितल्यानं इच्छा नसतानाही निघावं लागलं. पर्वतीय भाग चढून जाणं आणि उतरणं या दोन्हीही गोष्टी अवघड असतात. जराशी घाई मोठ्या संकटाचं निमंंत्रण असते. या लेकला येताना आणि जाताना अधूनमधून दाट धुक्याचा आणि पावसाचा अनुभव घेतला. पाऊस आला की तो फार वेळ नसायचा, मात्र आला की सगळ्यांची पोंचो (ट्रेकिंगसाठी वापरला जाणारा ढगळ रेनकोट) घालण्यासाठी धावपळ व्हायची. खाली उतरताना मला खूप थकवा जाणवत होता. पण ट्रेक पूर्ण केल्याने थोडा ताण कमी झाला होता. हिमालयातला हा ट्रेक जसा शारिरीक क्षमतांची परीक्षा पाहणारा होता तसाच तो मानसिक कसोटी बघणाराही होता. अनेकदा अगदी वरवर साध्यासाध्या दिसणाऱ्या गोष्टी करताना प्रचंड दमछाक व्हायची. अगदी बूट घालताना आणि काढतानासुद्धा खूूूप थकायला व्हायचं. टेंन्टमध्ये गेल्यावर बाहेर पडायची सुद्धा इच्छा होत नसे. अनेकदा भूक लागत नसे. पाणी दातांना कणके बसतील इतके थंड असल्यानं पीता येत नसे. अशावेळी सगळया ट्रेकर्सनी एकमेकांना मदतीचा हात देत, प्रसंगी प्रोत्साहन देत तिसऱ्या दिवसाचा ट्रेक पूर्ण केला. दुपारी दोन वाजता पुन्हा खाली रोलाखोलीला आलो. लीडरने सगळ्यांना थोडावेळ आराम करायला सांगून बरोबर तासाभरानं मॅगी खायला मुख्य टेंन्टमध्ये बोलावलं होतं. मला तर भूक अजिबातच लागली नव्हती. त्यातच अंगात खूप ताप भरल्यासारखं झालं आणि बाहेर प्रचंड थंडी,त्यामुळे मी टेंन्टमध्ये आराम करणंच पसंत केलं. संध्याकाळी जरा बरं वाटल्यावर आम्ही मित्रांनी गप्पा मारल्या, पुढचा ट्रेक कधी करायचा याबद्दल चर्चा झाली. थोडावेळ फिरलो. रात्री लीडरने जेवणानंतर सगळयांना कॅम्पच्या मध्यभागी बोलावलं. चौथ्या दिवसाच्या सूचना दिल्या. मुख्य म्हणजे सकाळी लवकर उठून सामानाची आवराआवर करायची होती. टेंन्ट सोडायचे होते. थकल्यामुळे रात्री सगळे लवकर झोपी गेलो.

कॅम्पचा
चौथा आणि शेवटचा दिवस असल्यानं आनंद आणि दु:ख अशा संमीश्र भावना माझ्या
मनात दाटून आल्या होत्या. बाहेर आणि आत प्रचंड थंडी, झऱ्यांतून वाहणारं
थंडगार पाणी यामुळे कसंबसं ब्रश करणं अाणि चूळ भरणं व्हायचं. ट्रेकमध्ये
अंघोळ हा भाग नसल्यानं तयार व्हायला फार कमी वेळ लागायचा. सकाळी सहाला
उठून आठपर्यंत चहा नाश्ता घेतला. आम्ही सगळ्यांनी आपापले टेंन्ट सोडून
त्यांच पॅकिंग केलं. टेन्ट काढून व्यवस्थित गुंडाळून कसे ठेवायचे,याचं
प्रशिक्षण आम्हाला ग्रुप लीडर्सनी पहिल्याच दिवशी दिलं होतं.टेन्टच्या
परीसरातला सगळा कचरा गोळा करून तो कचऱ्याच्या डब्यात टाकला. त्यानंतर
ट्रेकिंगच्या बॅगा खेचरांच्या पाठीवर दिल्या. पर्वतीय भागात मोकळं चालणंही
तितकंसं सोपं नसल्याचा अनुभव या ट्रेकमध्ये आला. आता उतरण असली तरी सगळ्या
गोष्टी सांभाळून कराव्या लागत होत्या. चालताना घसरून पडायची शक्यता जास्त
होती. अधूनमधून भृगू लेकच्या दिशेनं वर जाणारे इतर ट्रेकर्सही छोट्या
वाटांत अडथळे ठरत होते. त्यांच्या जोडीला सामान वाहणारी खेचरंही होती.
जवळपास सलग दीड तास चालल्यानंतर मार्गात मॅगी पॉईंटला चहा घेऊन आणि तिथल्या
प्रसिद्ध भाज्या घालून केलेली मॅगी खाऊन मार्गस्थ झालो. आम्ही भृगु लेक
चढताना अन्य ट्रेकर्सना 'कितना दूर है' असं विचारत असू आणि आता लोक आम्हाला
विचारत होते कि 'भृगू लेक कितना दूर है'?साधारणत: बारा वाजता बेस कॅम्प
पासून जवळ असलेल्या गुलाबा या ठिकाणी पोहोचलो. जीप खाली उभ्या होत्या.
खेचरं आमच्या आधीच तिथे जाऊन शांतपणे उभी राहिली होती. बॅगा जीपमध्ये
चढवून ग्रुप लीडर माझ्या सारख्या उशीर झालेल्या लोकांना 'शाब्बाश,
शाब्बाश, चलो,चलो' म्हणत होते. शेवटी जीपमध्ये बसलो. अरूंद, वळणावळणाचे आणि
तीव्र उताराचे रस्ते पार करीत पाऊस, धुकं आणि ट्रॅफीकमधून मार्ग काढत
तासाभरात मनालीला पोहचलो. रात्री हिमाचल परिवहनच्या बसने मनाली ते चंदीगड
आणि नंतर चंदीगड ते मुंबई असा प्रवास करुन घरी परतलो.हिमालयातील या ट्रेकनं
मला नक्की काय दिलं? आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा परीघ आपल्याला
जाणवतो त्यापेक्षा खूप मोठा असतो,हे या ट्रेकमुळे पहिल्यांदा
जाणवलं.दैनंदिन महानगरी आयुष्याच्या चाकोरीतून चालताना क्वचितच जाणवणारं
'स्व'त्व हिमालयाच्या कुशीत गेल्यावर प्रकर्षानं जाणवलं,त्याच बरोबर त्या
विराट निसर्गाच्या सहवासात राहिल्यानं माझ्या आतआपसूकच एक नम्रपणा जागा
झाल्याची जाणीव झाली.
आयुष्यात पुढे कधी प्रचंड
आव्हानांचा सामना करण्याची वेळ आली,तर तो आपण करु शकतो, असा आत्मविश्वासही
या ट्रेकने जागवला.हे बळ माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे.
मच्छिंद्र बोऱ्हाडे

After knowing about it, feel like going...
ReplyDeleteVery nicely expressed
ReplyDeleteVery nice sirji
ReplyDeleteछान सर
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteवा! मस्त अनुभव
ReplyDeleteGood experience....nicely written with all details...
ReplyDeleteGreat👌👍
ReplyDeleteगुरुजी ! छान उत्तम मांडले आहे
ReplyDeleteसर , ब्लॉग एकदम मस्त !
ReplyDeleteमी पण मनाने फिरलो तुमच्या ग्रुपबरोबर.सुंदर निसर्ग- फोटो पाहून प्रफुल्लित झालो .
बर्फात पाय अडकण्याचा प्रसंग खूपच थरारक !!!
ध्येय गाठण्याच्या इच्छेने शारीरिक त्रासावर मात केली आणि एक आनंददायी अविस्मरणीय अनुभव तुम्ही घेतलात.
आणि
तुमच्या ओघवत्या लेखनशैलीमुळे तो अनुभव वाचकांना ही आनंद देऊन जाईल हे नक्की.
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
- प्रमोद गोडबोले.